Home गडचिरोली तिरंगा म्हणजे राष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक; आमदार डॉ. मिलिंद नरोटे !_ गडचिरोली...

तिरंगा म्हणजे राष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक; आमदार डॉ. मिलिंद नरोटे !_ गडचिरोली शहरात भाजयुमोची भव्य तिरंगा रॅली उत्साहात; राष्ट्रप्रेमाच्या जयघोषाने शहर दुमदुमले

0
19

तिरंगा म्हणजे राष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक; आमदार डॉ. मिलिंद नरोटे

गडचिरोली शहरात भाजयुमोची भव्य तिरंगा रॅली उत्साहात; राष्ट्रप्रेमाच्या जयघोषाने शहर दुमदुमले

जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्या नेतृत्वात आयोजन; भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

गडचिरोली | दि. १४ ऑगस्ट २०२६ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने गडचिरोली शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात डौलाने फडकणारा तिरंगा, देशभक्तीपर घोषणांनी भरलेले वातावरण आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने संपूर्ण शहरात राष्ट्रप्रेमाची लहर निर्माण झाली. रॅलीला भाजपा पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर केशव भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनात ही तिरंगा रॅली काढण्यात आली. राष्ट्रध्वजाप्रती आदर, देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जनमानसात अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या रॅलीत मोठ्या संख्येने युवा , विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरीक सहभागी झाले.

राष्ट्रप्रेम आणि युवा शक्तीला प्रोत्साहन

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तिरंग्याचे महत्त्व अधोरेखित करत “तिरंगा म्हणजे केवळ राष्ट्रध्वज नव्हे, तर तो देशाच्या स्वाभिमानाचे, एकतेचे आणि अखंडतेचे प्रतीक आहे,” अशी भावना व्यक्त केली. राष्ट्रप्रेमाची भावना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि युवकांमध्ये राष्ट्रनिष्ठा व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.

आमदार डॉ. नरोटे यांच्या मार्गदर्शनामुळे रॅलीच्या आयोजनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत रॅली यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

मान्यवरांची उपस्थिती

रॅलीमध्ये भाजपा राष्ट्रीय जनजाती मोर्चाचे महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गडचिरोली शहराच्या नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर, महिला मोर्चा अध्यक्षा योगिता पिपरे, भाजपा ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, रमेशजी भुरसे, प्रमोदजी पिपरे, गडचिरोली शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा उपाध्यक्ष अनिल पोहनरकर, भाजपा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्यासह नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशभक्तीच्या घोषणांनी शहर दुमदुमले

तिरंगा रॅलीच्या माध्यमातून भाजयुमोच्या युवा कार्यकर्त्यांनी देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवकांमुळे रॅलीला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. शहरातील विविध भागांतून रॅली पुढे सरकत असताना ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

नागरिकांनीही रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. या निमित्ताने शहरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले.

तिरंगा म्हणजे राष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक

तिरंगा हा देशाचा स्वाभिमान, अखंडता, एकता आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असल्याची भावना रॅलीत सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरव करत प्रत्येक नागरिकाने देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.

या भव्य तिरंगा रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष, जिल्हा व तालुका पदाधिकारी, जिल्हा महामंत्री तसेच युवा मोर्चाच्या विविध स्तरांवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनात आणि भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीतून गडचिरोली शहरात राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा  संदेश पोहोचला. रॅलीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या नागरिकांचे भाजयुमोच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!