Home गडचिरोली लांझेडा येथे मुख्य महामार्गावर घरबांधकामाचे साहित्य ; नागरीकांच्या जिवाशी खेड? नगर परिषद...

लांझेडा येथे मुख्य महामार्गावर घरबांधकामाचे साहित्य ; नागरीकांच्या जिवाशी खेड? नगर परिषद झोपेत, कारवाईची मागणी

0
17

लांझेडा येथे मुख्य महामार्गावर घरबांधकामाचे साहित्य ; नागरीकांच्या जिवाशी खेड? नगर परिषद झोपेत, कारवाईची मागणी

रस्त्याचा भाग अडवला; अपघाताचा धोका वाढल्याने संतप्त प्रतिक्रिया

 

गडचिरोली: लांझेडा येथील मुख्य महामार्गालगत सुरू असलेल्या घरबांधकामासाठी थेट रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात रेती व गिट्टी टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक वापराच्या मुख्य मार्गावर बांधकाम साहित्याचा ढिगारा करून रस्त्याचा काही भाग अडवल्याने वाहनचालकांना धोका पत्करून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामासाठी रेती व गिट्टी थेट महामार्गाच्या कडेला नव्हे तर वापरात असलेल्या रस्त्याच्या भागात साठवण्यात आली आहे. परिणामी वाहनांसाठी उपलब्ध जागा कमी झाली असून दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

विशेष म्हणजे, हा मार्ग परिसरातील महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता मानला जातो. अशा ठिकाणी कोणतीही सूचना फलक, सुरक्षा व्यवस्था न करता साहित्य टाकल्याने अपघाताची शक्यता वाढल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अथवा वेगाने येणाऱ्या वाहनांसाठी हा अडथळा अधिक धोकादायक ठरू शकतो.

या संपूर्ण प्रकारावर स्थानिक प्रशासन आणि नगर परिषदेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्य रस्त्यावर पडून असताना संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही.

नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत विचारले आहे — “सार्वजनिक रस्ता हा बांधकामासाठी वापरण्याची मुभा आहे का? नियम सर्वसामान्यांसाठीच आणि अशा प्रकारांकडे प्रशासन दुर्लक्ष का?”

नागरिकांच्या प्रमुख मागण्या :

मुख्य रस्त्यावरून रेती-गिट्टी तात्काळ हटवावी , संबंधित बांधकामाची चौकशी करून नियमभंगावर कारवाई करावी , वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी , भविष्यात अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी नियमित पाहणी करावी

“सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण किंवा बांधकाम साहित्य साठवून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे; अन्यथा मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही,” अशी तीव्र भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!