
दुर्गम गडचिरोलीत विकासाची मशाल पेटवणारा नाव_ प्रणय खुणे
*शून्यातून गाठलं यशाचं शिखर!* प्रणय खुणे
चलो चलें उन राहों पर, जहाँ मंज़िल का पता न हो,
कारवाँ खुद-ब-खुद बनेगा, बस इरादा नेक होना चाहिए’!*
प्रसिध्द उद्योजक, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. प्रणय खुणे यांना या ओळी लागू पडतात.
परीस्थीती कितीही कठीण असली तरी मेहनत चिकाटी आणी प्रामाणीकपणाच्या जोरावर तेा शून्यातूनही मोठी झेप घेउू शकतो इतीहासात आणी आजच्या काळात अनेक व्यक्तींनी अंत्यत साध्या परिस्थितीतुन सूरवात करून मोठे यश मीळवले आहे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी कष्ट करणे आवश्यक आहे जो माणूस प्रामाणीकपणे मेहनत करतो त्याला यश नक्की मीळते रस्ता कितीही कठीण असला, खाचखळग्यांनी भरलेला असला तरीही जिद्दीच्या जोरावर त्यावर मात करणाराच इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरतो. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावीत जिल्ह्यात एका सामान्य माणसान शासकिय नोकरीचा राजीनामा देऊन उद्योगाचे ‘शिवधनुष्य’ पेलले आणि आज हे जिद्दी व्यक्तिमत्व अतीदूर्गम व नक्षलप्रभावित क्षेत्रात 500 कि.मी पेक्षा विकासाचे रस्ते बांधत आहे. श्री .प्रणय . खुणे म्हणजे एका जिद्दीचे नाव आहे.
*घरून आईने दिलेली त्या काळातील ‘ती’ लोखंडी पेटी अन् प्रवासाची सुरुवात…*
कुरखेडा तालुक्यातील गुरनोली या छोट्याशा गावातून प्रणय खुणे यांचा प्रवास सुरू झाला. करिअरची सुरुवात करण्यासाठी जेव्हा ते घराबाहेर पडले, तेव्हा खिशात भांडवल नव्हते, तर एक घरचि पूरातन काळातील ‘लोखंडी पेटी’ होती. त्या पेटीत एक ताट, वाटी, ग्लास आणि अंथरण्यासाठी एक चादर… हीच त्यांची खरी पुंजी! शासकिय नौकरीत काम करताना त्यांनी आदिवासी पाड्यांवरील दुःख जवळून पाहिले, पण केवळ शासकीय नोकरीत राहून बदल घडवता येणार नाही, हे ओळखून त्यांनी २०१८ मध्ये शासकिय नौकरीचा राजीनामा दिला आणि ‘एलएलडी कन्स्ट्रक्शन’च्या माध्यमातून नवनिर्माणाची पायरी चढली, पुढे त्यांनी खुणे कन्स्ट्रक्शनचीही स्थापना केली.
*नक्षलवाद्यांनी ६४ वाहने जाळली, पण जिद्द कायम!*
गडचिरोलीत उद्योग करणे म्हणजे ‘आगीशी खेळ’ असे एकेकाळी वातावरण होते. अशा काळात श्री. प्रणयजी खुणे यांनी जिल्ह्यात ५०० किलोमीटरचे रस्ते बांधले. अतीदूर्गम व घनदाट जंगल आणि नक्षल्यांच्या दहशतीच्या छायेत ही कामे करताना त्यांच्या कंपनीची तब्बल ६४ वाहने नक्षलवाद्यांनी जाळून खाक केली. कोट्यवधींचे नुकसान झाले, जीवावर बेतणारे प्रसंग आले; पण श्री प्रणय खुणे मागे हटले नाहीत. ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा जायला सूध्दा धजावत नव्हती, तिथे त्यांनी रस्ते , पूलीया चि बांधकाम करून दुर्गम गावं मुख्य प्रवाहाशी जोडली. आज त्यांच्या प्रकल्पांतून ५०० पेक्षा जास्त स्थानिक हातांना सन्मानाचा रोजगार मिळाला आहे.
‘मुतनूर पहाडी’चा तसेच कोठरी येथील बूध्दविहाराचा कायापालट: श्रद्धेला दिली पर्यटनाची जोड
केवळ रस्ते बांधून ते थांबले नाहीत. तर सामाजीक व धार्मीक कार्याचि आवड असल्याने चामोर्शी तालुक्यातील मुतनूर पहाडीचा तसेच चामोर्शी तालूक्यातील कोठरी येथील बूदधविहाराचा स्थापना करून दोन्ही धार्मीक स्थळांना सातत्याने शासनाकळे पाठपूरावा करून वर्ग (क) मध्ये आणून दोन्ही धार्मीक स्थळांचा केलेला कायापालट हा अभ्यासाचा विषय आहे. मुतनूर येथील १००० मीटर उंचीवरील या पहाडीवर पूरातन कूपारलींगो चे देवस्थान असून सोबतच श्री शंकर, हनुमान आणि दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून या दोन्ही धार्मीक स्थळांकरीता रस्ते व इतर विकासासठी प्रयत्न केल्या गेले त्यामूळे सदर दोन्ही धार्मीक स्थळ महाराष्टॉत व इतर राज्यात नावारूपास आले . आज तिथे स्थानिक लोक छोटी मोठी दुकानं थाटून आपला उदरनिर्वाह करत आहेत. तसेच या दोन्ही धार्मीक स्थळांना विकासाच्या कामाकरीता वैयक्तीक सूदधा भरीव मदत केली .तसेच गडचिरोली जिल्हा हा पर्यटन जिल्हा घोषीत करण्यासाठी त्यांचा शासन दरबारी असलेला पाठपूरवठा वाखाणण्याजोगा आहे.
समाजकारण, राजकारणात छाप
प्रणय खुणे यांच्या रक्तातच समाजकारण आहे. राजकारणातही ते सक्रिय आहेत. सध्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्ष संघटनेतही आपली वेगळी छाप पाडली आहे. राजकारणाकडे ते सत्ता मिळवण्याचे साधन म्हणून नाही, तर समाजसेवेचे माध्यम म्हणून पाहतात. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही ते सामान्यांच्या हक्कासाठी लढत आहेत.
गडचिरोली म्हणजे अनेकांच्या डोळ्यापुढे वेगळे चित्र येते, पण या जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिलेले आहे. इथल्या बांबू आणि मोहावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिले, तर इथला तरुण मुंबई-पुण्याकडे अथवा पर राज्यात धावणार नाही. जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास झाला पाहिजे,*गडचिरोली जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित करण्यात यावे* त्यासाठी सरकारने हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर करायला हवे. असे स्पष्ट मत आहे
– श्री .प्रणय खुणे जिल्हा उपाध्यक्ष, भाजप
….
सामाजिक कार्याची पावती
श्री.प्रणय खुणे यांनी सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे,अडीअडचणीत लोकांच्या मदतीला तसेच जिल्हातील अनेक कॅन्सरग्रस्त रूग्नांना आर्थीक भरीव मदत केली तसेच , त्यांचे दु:ख, वेदना वाटून घेतात. याची दखल घेत ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाकडून ‘लोकनायक’ पुरस्काराने ,तसेच रीसेल अर्तगत भारत बीझनेस अर्वाड पूरस्काराने तसेच सकाळ वृत्तपत्राकडून सकाळ भूमीपूत्र अर्वाड ,तसेच स्वीफट एनेल अंर्तगत भारत उदयोग रत्न पूरस्कार तसेच डॉ .एपिजे अब्दूल कलाम अंतर्गत भारतीय रत्न सम्मान पूरस्कार देवून गौरव झालेला आहे. तसेच श्री.प्रणय खुणे यांचे स्पष्ट असे मत आहे कि, जिल्हयात उदयोग क्रांती निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्हयाच्या विकासासाठी अनेक उदयोग येत आहेत . पंरतू कूठेतरी स्थानिक सूक्षीसीत बेरोजगारांना या येणा-या उदयोगात प्रथम प्राधान्य मीळाल्यास स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मीळूण जिल्हयाच्या विकास होण्यास मदत होइल.
…..
नाम’च्या कामात श्री. प्रणय खुणेंचा मोलाचावाटा!
गडचिरोलीसारख्या दुर्गम, अविकसित जिल्ह्यात ‘नाम फाउंडेशन’ने गाळ उपसा मोहिमेचा श्रीगणेशा केला, तेव्हा श्री. प्रणय खुणे यांनी मदतीचा मोठा हात पुढे केला. जिल्ह्यातील जवळपास अनेक तलावांमधील गाळ उपसा करून जलसाठे पुनरुज्जीवित करण्यात खुणे यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या निस्वार्थी समाजकार्याची दखल खुद्द ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली. पुण्यातील एका विशेष कार्यक्रमात नाना पाटेकर हस्ते श्री. प्रणय खुणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हा सन्मान केवळ श्री. प्रणय खुणे यांच्या सामाजिक कार्याचा परिचय देत राहतो.
…..
‘मानवाधिकारा’सह महिला सक्षमीकरणा चा ध्यास!
श्री.प्रणय खुणे हे केवळ यशस्वी उद्योजकच नाहीत, तर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात त्या माध्यमातून सामान्यांचे आधारस्तंभ बनले आहेत. संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी जिल्ह्यात अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या.
विविध क्षेत्रांत नाव कमावणाऱ्या जिल्ह्यातील १५० हून अधिक गुणवंतांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले.
आरोग्य असो वा शिक्षण, संकटकाळी अडल्या-नडल्यांच्या मदतीला धावून जाण्यात श्री प्रणय खुणे नेहमीच अग्रभागी असतात.
क्रीडा क्षेत्राचि आवड .
श्री . प्रणय खूणे यांची सूरवातीपासूनच क्रीडा क्षेत्रात आवड राहीली असून ते जिल्हाभर फीरत असल्याने गडचिरोली जिल्यातील खेळाडूत नैसगीक गूणवत्ता असल्याने व गडचिरोलीत खेळण्याकरीता विशेष सूवीधा नसल्याने गडचिरोली जिल्हयातील खेळाडू हे मागे पडत आहे ही बाब हेरून श्री . प्रणय खूणे यांनी दिल्ली येथे जावून भारतीय क्रीकेट संघाचे मूख्य प्रक्षीक्षक श्री गौतम गंभीर यांची त्यांचे दिल्ली निवासस्थानि भेट घेवून भव्य क्रीडा अकादमी गडचिरोली जिल्हयात स्थापन करणेबाबत कळकळीची विनंती केली
….
श्री. प्रणय खुणे यांनी सुचविलेले असे आहे व्हिजन….
बांबू ठरणार जिल्ह्याचा ‘ग्रीन गोल्ड’
गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या बांबूच्या साठ्यांचा योग्य वापर झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेत क्रांती घडू शकते.
कच्च्या बांबूपासून काड्या तयार करून अगरबत्ती निर्मितीचा मोठा प्रकल्प उभा राहू शकतो.
बांबू पासून शोभेच्या वस्तू, टोपल्या, खेळणी आणि फर्निचर बनवण्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
प्रत्येक तालुक्यात ‘स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ सुरू झाल्यास तरुणांना तांत्रिक प्रशिक्षण मिळून स्वयंरोजगार वाढेल.
कच्चा बांबू विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार केल्यास स्थानिक मजुरांचे उत्पन्न दुप्पट होईल.
पर्यटन जिल्हा : विकासाची नवी पहाट
जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळांना केवळ ‘क’ वर्ग दर्जा देऊन चालणार नाही, तर त्यांचा प्रत्यक्ष विकास होणे गरजेचे आहे. डॉ. खुणे यांनी
शासन दरबारी मान्यता मिळालेल्या ५० पर्यटन स्थळांवर मूलभूत सोयीसुविधा (रस्ते, वीज, पाणी) पुरवणे.
पर्यटनामुळे स्थानिक लोकांना ‘होम-स्टे’ किंवा मार्गदर्शक म्हणून रोजगाराच्या संधी मिळतील.
दुर्गम भागातील धबधबे, मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे जगाच्या नकाशावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न.
पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्थानिक बचतगटांना उपाहारगृहे किंवा हस्तकला विक्री केंद्र चालवण्यास देणे.








