Home गडचिरोली नागपुरात भाजपच्या प्रशिक्षण महाअभियानाची आढावा बैठक उत्साहात संपन्न

नागपुरात भाजपच्या प्रशिक्षण महाअभियानाची आढावा बैठक उत्साहात संपन्न

0
104

नागपुरात भाजपच्या प्रशिक्षण महाअभियानाची आढावा बैठक उत्साहात संपन्न

 

 

गडचिरोली:भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता एअरपोर्टजवळील ग्रँड एअरपोर्ट बँक्वेट येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

या बैठकीला राष्ट्रीय, प्रदेश आणि विदर्भ पातळीवरील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. राष्ट्रीय सहसंघटनमंत्री मा. श्री शिवप्रकाशजी, प्रशिक्षण अभियानाचे प्रदेश संयोजक श्री राजेश पांडे, संयोजक श्री रघुनाथ कुलकर्णी, भाजपा प्रदेश महामंत्री श्री संजय कुटे तसेच विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी मार्गदर्शन केले.

 

बैठकीत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या मंडलस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशिक्षण अधिक प्रभावी व यशस्वी होण्यासाठी विविध महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. विशेषतः प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली निवास व्यवस्था, नियोजनबद्ध कार्यक्रम रचना, वातावरण निर्मिती, तसेच सक्षम वक्त्यांची निवड यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

 

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या बौद्धिक आणि संघटनात्मक क्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

 

या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा महामंत्री, प्रशिक्षण अभियानाचे जिल्हा संयोजक तसेच विविध स्तरांवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

गडचिरोली जिल्ह्यातून माजी खासदार डॉ. अशोक नेते, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे तसेच विधानसभा स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे जिल्ह्याचे संघटनात्मक बळ अधिक दृढ असल्याचे चित्र या बैठकीत दिसून आले.

 

 

* *बैठकीदरम्यान महत्त्वपूर्ण भेट; संघटन बळकटीकरणावर ठोस रणनीती*

 

या आढावा बैठकीदरम्यान गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी राष्ट्रीय सहसंघटनमंत्री मा. श्री शिवप्रकाशजी यांची विशेष भेट घेतली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील संघटनात्मक स्थिती, कार्यकर्त्यांची ताकद आणि आगामी काळातील विस्तार यावर सखोल चर्चा करण्यात आली.

 

जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कोणत्या स्तरावर काम करावे, कार्यकर्त्यांपर्यंत प्रशिक्षण प्रभावीपणे कसे पोहोचवावे आणि गाव ते मंडल स्तरावर पक्षाची पकड कशी वाढवावी याबाबत ठोस रणनीती आखण्यात आली. या चर्चेमुळे गडचिरोली जिल्ह्यात आगामी काळात संघटनात्मक कामाला अधिक गती मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.

 

 

या आढावा बैठकीमुळे आगामी काळात प्रशिक्षण महाअभियान अधिक व्यापक आणि प्रभावी पद्धतीने राबविण्यास निश्चितच गती मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!