Home गडचिरोली गडचिरोलीत काँग्रेसचा बिनबुडाचा आरोप;“आशिष पिपरे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक; भाजपाशी कुटलाही संबंध नाही”...

गडचिरोलीत काँग्रेसचा बिनबुडाचा आरोप;“आशिष पिपरे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक; भाजपाशी कुटलाही संबंध नाही” – रमेशजी बारसागडे

0
32

गडचिरोलीत काँग्रेसचा बिनबुडाचा आरोप;“आशिष पिपरे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक; भाजपाशी कुटलाही संबंध नाही” – रमेशजी बारसागडे

 

गडचिरोली, प्रतिनिधी :

चामोर्शी येथे अगरबत्ती प्रकल्प सुरू करून रोजगाराचे आमिष दाखवत महिलांची फसवणूक केल्याच्या प्रकरणावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असताना, भाजपाने काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्ती आशिष पिपरे यांचा भारतीय जनता पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचा भाजपाने स्पष्ट केले आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे काही महिला उपोषणाला बसल्या होत्या. या उपोषणस्थळी जिल्हा कॉंग्रेस कमीटिचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी भेट देत भारतीय जनता पार्टीवर थेट आरोप केले. बिजेपीचे नगरसेवक आशिष पिपरे मुळे देवा भाऊच्या लाडक्या बहिणीला उपोषण करावा लागत आहे व भारतीय जनता पार्टी आशिष पिपरे ला पाठिशी घालत आहे मात्र हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

पत्रकारांशी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,

“आशिष पिपरे हे पूर्वी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते परंतु आज भाजपाच्या कोणत्याही पद किंव्हा जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यांचा भाजपाशी कोणताही संबंध नाही. यांचे व्यैक्तीक संबंध अनेक राजकीय पक्षाच्या लोकांशी आहेत.कदाचित कॉंग्रेस विसरलेला असावा चामोर्शी नगर पंचायत मध्ये काँग्रेसच्या कोट्यामधून स्वीकृत नगरसेवक असून काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या नेत्यांच्या संपर्कात होते.आशिष पिपरेचे भारतीय जनता पार्टीशी कोणतेही संबंध राहिलेले नाहित त्यामुळे आशिष पिपरेच्या कोणत्याहि घटनेचा संबंध भारतीय जनता पार्टीशी जोडू नये अशा परिस्थितीत भाजपावर आरोप करणे हा केवळ राजकीय स्टंट आहे.”

 

भाजपाने पुढे सांगितले की, भारतीय जनता पार्टी ही सामान्य जनतेची पार्टी असून सामान्य नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहते. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला किंवा चुकीच्या कृत्यांना भाजपाचा कधीही पाठिंबा नसतो. “काँग्रेसने महिलांच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करू नये, असेही भाजपाने नमूद केले आहे.

जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपावर खोटे आरोप करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा निर्धार भाजपाने व्यक्त केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणी सखोल चौकशी करून दोषीं आढळल्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!