
पोलीस शिपाई भरतीसाठी येणाऱ्या युवक–युवतींसाठी मोफत निवास व भोजनाची व्यवस्था
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, गडचिरोलीचा स्तुत्य उपक्रम; गरजू उमेदवारांना दिलासा
गडचिरोली :गडचिरोली पोलीस विभागामार्फत पोलीस शिपाई व वाहन चालक पदांसाठी एकूण ७४४ रिक्त पदांची भरती प्रक्रिया दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल २६ हजारांहून अधिक युवक–युवतींनी अर्ज सादर केलेले आहेत.
मैदानी चाचणीसाठी गडचिरोली शहरात येणाऱ्या अनेक उमेदवारांना राहण्याची व भोजनाची अडचण भासते, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातून येणाऱ्या गरजू उमेदवारांसाठी हा मोठा प्रश्न ठरतो. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस, गडचिरोली तर्फे एक अत्यंत स्तुत्य व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत पोलीस शिपाई व वाहन चालक पदासाठी मैदानी चाचणी देण्यासाठी येणाऱ्या युवक व युवतींसाठी स्वतंत्र मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था ग्रँड हॉटेल, कोर्ट चौक, सेमाना रोड, गडचिरोली येथे उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उचललेल्या या पुढाकारामुळे स्पर्धा परीक्षेसाठी झटणाऱ्या युवक–युवतींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण गडचिरोली जिल्ह्यासमोर ठेवण्यात आले आहे. युवकांच्या भविष्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.
मोफत निवास व भोजनासाठी संपर्क :
लिलाधर भरडकर – ०९४०४५१९६८०
हिमांशू खरवडे – ०७५८८७२३३६६
सुमीत चव्हाण – ०९८८८१६४२७३६
मंथन बुलबुले – ०८९७५२६९२०२
संकेत जनगनवार – ०७३८७२८६६१५
बादल कंकलवार – ०९४२२३१७४४९
प्रतिक उपासे – ०९७६३१८७५१९
कुणाल चिलगेलवार – ०८२६३०१६३४१
चेतन पेंदाम – ०७९७२७७२३०२
सुजल सोरते – ०९२०९२७८३२५








