Home गडचिरोली गडचिरोली शहराच्या नियोजनबद्ध विकासाला गती; पालकमंत्री जयस्वाल- नगराध्यक्ष निंबोरकर यांचा ठोस रोडरॅम 

गडचिरोली शहराच्या नियोजनबद्ध विकासाला गती; पालकमंत्री जयस्वाल- नगराध्यक्ष निंबोरकर यांचा ठोस रोडरॅम 

0
22
Oplus_0

गडचिरोली शहराच्या नियोजनबद्ध विकासाला गती; पालकमंत्री जयस्वाल- नगराध्यक्ष निंबोरकर यांचा ठोस रोडरॅम

 

गडचिरोली :गडचिरोली शहराचा भविष्यातील नियोजित, सुव्यवस्थित आणि सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी नगर परिषद गडचिरोली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री तथा सहपालकमंत्री मा. ना. अँड. आशिषजी जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर व सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

 

पालकमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या हस्ते नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी गडचिरोली शहराच्या दीर्घकालीन विकास आराखड्याला प्राधान्य देत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

 

विकास आराखडाच शहराच्या प्रगतीची दिशा ठरवणार – पालकमंत्री जयस्वाल

 

बैठकीत गडचिरोली शहराच्या विकास आराखड्यावर सखोल व सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या, वाहतूक व्यवस्था, रिंगरोड, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य व शैक्षणिक सुविधा यांचा समावेश असलेला शास्त्रशुद्ध विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला.

 

पालकमंत्री जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना विकास आराखड्याची अंमलबजावणी वेळेत, पारदर्शक आणि नागरिककेंद्री पद्धतीने करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. “आज घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षे शहराची दिशा ठरवणार आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

 

नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर यांचा नियोजनबद्ध विकासावर जोर

 

नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी सांगितले की,

विकास आराखड्याशिवाय शाश्वत शहर विकास शक्य नाही. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि शहर विस्तार यांचा समतोल राखून नागरिकांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवणारा विकास आराखडा राबवण्यात येईल.

 

प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावून, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

प्रशासन व लोकप्रतिनिधींचा समन्वय

 

या बैठकीस जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ मिलिंद नरोटे, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, नगर परिषदेचे विषय समिती पदाधिकारी व सर्व नगरसेवक उपस्थित होते. विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय राखण्यावर सर्वांनी एकमताने भर दिला.

 

“जनसेवाच आमचे ध्येय”

 

पालकमंत्री आशिषजी जयस्वाल व नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर यांनी संयुक्तपणे स्पष्ट केले की,

“विकास आराखड्याच्या माध्यमातून गडचिरोली शहराचा नियोजनबद्ध, पारदर्शक व नागरिकहिताचा विकास हाच आमचा संकल्प आहे.”

 

विकास आराखड्याला केंद्रस्थानी ठेवून घेतलेले हे निर्णय गडचिरोली शहराला आधुनिक व सुव्यवस्थित शहराकडे नेणारे ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!