
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची जनसंवाद यात्रे दरम्यान धानोरा नगरपरिषदेला व भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट
गडचिरोली | माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी धानोरा येथे जनसंवाद यात्रे दरम्यान नगरपरिषदेला सदिच्छा भेट दिली. यावेळी नगरपरिषदेच्या सभागृहात धानोरा शहर व तालुक्यातील विभिन्न पक्षाच्या पदाधिकारी व नागरिक, धानोरा नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. शहराच्या तथा तालुक्यातील विभिन्न समस्या व सर्वांगीण विकासासंदर्भात यावेळी सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नगरपरिषद प्रशासकीय भवनाला जागा मंजूर करून वाढीव निधी देण्यात यावा, शहरातील वाढत्या लोकसंख्ये नुसार गटार लाईन साठी निधी उपलब्ध करून देणे, वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करणे, धानोरा शहराचा C. T. सर्वे व डेव्हलोपमेंट प्लॅन करणे, धानोरा शहरातील बाजाराचे डेव्हलोपमेंट करणे, धानोरा शहरातील सर्व तलाव नगरपरिषदला हस्तान्तरीत करणे, अतिक्रमण पट्टे नियमित करणे, अंडर ग्राउंड इलेक्ट्रिक सिटीला मंजुरी मिळविणे, वडसा तालुक्यात गाढवी नदीवर बंधारे बांधून सिंचनाची व्यवस्था करणे, वडसा तालुक्यामध्ये प्ले ग्राउंड ला मंजुरी देणे, शहरातील ओपन स्पेस डेव्हलोपमेंट करणे, प्रधानमंत्री आवास योजना मंजूर करणे, धानोरा शहराच्या बाजूने रिंग रोड व शहरातून फ्लाय ओवर ब्रिज तयार करणे, शाळा व अंगणवाडीचे नगरपंचायतला हस्तान्तरीत करणे, धानोरा ते मुरूमगाव तसेच धानोरा ते चव्हेला, मुंग्नेर, पेंढरी व चातगावते साखेरा रस्ता मंजूर करणे, चव्हेला सिंचन प्रकल्प मंजूर करणे, शहरात शहरातील तलावांचे सौंदर्यकरण करणे, गुजरी व आठवडी बाजाराचे सौंदर्यकरणकरणे, शहरातील मोठया नाल्यावर क्लोज्ड ड्राइनाज करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे आदी विषयांसोबतच वडसा शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, जलनिस्सारण व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. शहराच्या भविष्यातील विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे उपयोग करण्याबाबत डॉ. देवराव होळी यांनी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी हा सर्व डेटा गोळा करून संबंधित मंत्री, विभाग व मुख्यमंत्री यांसोबत बसून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.
विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी केले. यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा सयाम, सागर साबळे, साजन गुंडावार, संजय कुंडू, बाळू उंदीरवाडे, अर्पण साळवे, महादेव गणोरकर, भुमाला परचाके, निराशा मडावी, विजय कुमरे, भाष्कर सयाम, महेश चिमुरकर, शंकर निंबोरकर, भक्तदास गडपायले, सुजित राय, नरेश चिमुरकर, प्रदीप बोगा, राजू मोहुर्ले, माणिक शहा मडावी, भूषण उंदीरवाडे, गजानन साळवे, मुकेश बोडगेवार, जमीर कुरेशी, अनंत साळवे, मिलिंद किरंगे आदी नागरिक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवकांनीही शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर आपली मते मांडली. यावेळी धानोरा तालुका भाजपच्या वतीने माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
या भेटीदरम्यान तालुक्याच्या व शहराच्या विकासासाठी सकारात्मक चर्चा होऊन मार्गदर्शन मिळाल्याने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.








