Home गडचिरोली ५ फेब्रुवारीला स्व़ अजितदादा पवार यांचे अस्थिकलश गडचिरोलीत

५ फेब्रुवारीला स्व़ अजितदादा पवार यांचे अस्थिकलश गडचिरोलीत

0
20
Oplus_131072

५ फेब्रुवारीला स्व़ अजितदादा पवार यांचे अस्थिकलश गडचिरोलीत

 

गडचिरोली़:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी (दि़ २८) विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले.

 

दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अस्थिकलश गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत आहे़ प्रथम वडसा येथे सकाळी १०.३० वाजता अस्थिकलशाचे आगमन होईल़ त्यानंतर दुपारी १२ वाजता आरमोरी, दुपारी १.३० इंदिरा गांधी चौक गडचिरोली, सायंकाळी ३.३० वाजता चामोर्शी, सायंकाळी ४ वाजता विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथील उत्तर वाहिनी वैनगंगा नदीस्थळावर अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे़

 

तरी जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना च्या पदाधिकारी , पत्रकार, व्यापारी संघटना पदाधिकारी व नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेण्याकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन राकाँचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँ जिल्हाध्यक्ष तथा नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी केले आहे़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!