Home गडचिरोली गडचिरोलीत ‘जॉब शिक्षा एज्युकेशनल कन्सल्टिंग’ केंद्राचे थाटात उद्घाटन;विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी नवी दिशा! 

गडचिरोलीत ‘जॉब शिक्षा एज्युकेशनल कन्सल्टिंग’ केंद्राचे थाटात उद्घाटन;विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी नवी दिशा! 

0
55

गडचिरोलीत ‘जॉब शिक्षा एज्युकेशनल कन्सल्टिंग’ केंद्राचे थाटात उद्घाटन;विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी नवी दिशा!

डॉ. यशवंत दुर्गे यांच्या हस्ते सोहळा संपन्न

 

गडचिरोली:-

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला आणि करियरला योग्य दिशा देण्यासाठी ‘जॉब शिक्षा एज्युकेशनल कन्सल्टिंग’ केंद्राचे नवीन शाखा आता गडचिरोली शहरात कार्यान्वित झाली आहे. झाशी राणी नगर, चंद्रपूर रोड येथील आयटीआय चौकाजवळ या केंद्राचे उद्घाटन नामांकित डॉ. यशवंत दुर्गे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले.

या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ऋषी बर्डे, डॉ. बाडू सहारे, स्नेहल संतोषवार आणि नितीन शर्मा यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांनी फित कापून केंद्राचे अधिकृत उद्घाटन केले आणि सिद्धार्थ नरहरी यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

अहेरीनंतर आता गडचिरोलीत विस्तार करण्यात आले असून

‘जॉब शिक्षा एज्युकेशनल कन्सल्टिंग’चे संचालक सिद्धार्थ नरहरी यांनी आपल्या अथक परिश्रमातून हे केंद्र उभे केले आहे. त्यांनी प्रथम अहेरी येथे आपली शाखा सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले होते. आता गडचिरोलीतील वाढती गरज लक्षात घेता, चंद्रपूर रोडवरील आयटीआय चौक येथे ही दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे.

 

या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध कोर्सेस, प्रवेश प्रक्रिया, करिअर समुपदेशन आणि नोकरीच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. गडचिरोलीसारख्या भागात अशा प्रकारच्या कन्सल्टिंग केंद्राची गरज असल्याने, या नवीन शाखेमुळे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची योग्य निवड करणे सुलभ होणार आहे.

 

कोट :-

“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांना योग्य करियर निवडण्यासाठी हे केंद्र एक महत्त्वपूर्ण दुवा ठरेल. ग्रामीण भागातील टॅलेंटला योग्य व्यासपीठ मिळवून देणे हाच आमचा उद्देश आहे.” > — सिद्धार्थ नरहरी (संचालक, जॉब शिक्षा)

या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!