Home गडचिरोली माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंवाद यात्रेअंतर्गत नगरपंचायत देवरी येथे भेट

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंवाद यात्रेअंतर्गत नगरपंचायत देवरी येथे भेट

0
16

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंवाद यात्रेअंतर्गत नगरपंचायत देवरी येथे भेट

 

देवरी (जि. गोंदिया) : माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंवाद यात्रेअंतर्गत नगरपंचायत देवरी येथे सदिच्छा भेटीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरपंचायत अध्यक्ष संजू उईके, सभापती संजय दरोडे, नगरपंचायत देवरीचे माजी गटनेते संतोष तिवारी, तसेच रितेश अग्रवाल, नगरसेविका कौशल्या कुमरे, नगरसेविका सीताबाई रंगारी, नगरसेविका पिंकी कटकवार यांची उपस्थिती होती.

या भेटीदरम्यान नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामे, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व नागरिकांच्या विविध समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉ. देवराव होळी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्यासाठी नियोजनबद्ध व समन्वयाने काम करण्याचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

नवीन वर्षाच्या निमित्ताने डॉ. होळी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना नवीन वर्षाच्या डायरीचे वितरण करण्यात आले. जनसंवाद यात्रेमुळे नागरिकांशी थेट संवाद साधण्यास व विकासाच्या दृष्टीने सकारात्मक दिशा ठरविण्यास मदत होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

हा कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. जनसंवाद यात्रेमुळे नगरपंचायत क्षेत्रातील विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!