
विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांची उपस्थिती!
गडचिरोली : संघटित हिंदू – समर्थ भारत या संकल्पनेवर आधारित विराट हिंदू संमेलन शहरात अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घटनात्मक कार्य व सेवेच्या १०० वर्षांच्या गौरवपूर्ण परंपरेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाला नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांची उपस्थिती
हे विराट हिंदू संमेलन बुधवार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता संविधान चौकाजवळील प्रशस्त प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी आज घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर व नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
या संमेलनात प.पू. संत मुरलीधर महाराज तसेच नागपूर येथील प्रख्यात वक्ते प्रशांतजी दाणी यांनी समाजप्रबोधनपर मार्गदर्शन करत हिंदू समाजाच्या संघटनाचे महत्त्व विशद केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ झाली.
या संमेलनामुळे शहराच्या सामाजिक वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून समाजात एकोपा व राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत झाल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमास आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, नगरपरिषद सभापती (महिला व बालकल्याण) सीमाताई कन्नमवार, नगरसेवक सतीश विधाते, सामाजिक नेते किशोर वडेट्टीवार, बल्लारपूरे सर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सकल हिंदू समाजातील बांधव व भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांनी आपल्या मनोगतातून अशा वैचारिक व सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सलोखा, सांस्कृतिक जाणीव व राष्ट्रप्रेम अधिक बळकट करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.








