Home गडचिरोली लांझेडा वॉर्डातील जागृत हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार ; मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न 

लांझेडा वॉर्डातील जागृत हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार ; मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न 

0
19

लांझेडा वॉर्डातील जागृत हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार ; मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न

 

स्थानिक नागरिकांनी बांधकामास घेतला पुढाकार; मंदिराचे नविन बांधकाम सामाजिक- सास्कृतिक समृध्दीसाठी महत्वाचे

 

गडचिरोली: आज बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता लांझेडा वॉर्ड (प्रभाग क्र. ०२) येथील ‘पुरानी काढ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक हनुमान मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा भव्य वातावरणात पार पडला. सात दशकांपूर्वी स्थानिक पूर्वजांनी स्थापन केलेल्या या मंदिराला नवीन रूप देण्यासाठी संपूर्ण वॉर्डातील नागरिकांनी एकत्र येऊन आपले योगदान दिले. हा उपक्रम केवळ धार्मिक दृष्ट्या नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

 

सोहळ्यात उपस्थित प्रमुख अतिथींमध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक मा. सागरभाऊ निंबाळकर, बांधकाम सभापती मा. अनिलभाऊ कुनघाडकर, शिक्षक सभापती मा. हर्षलभाऊ गेडाम, नगरसेविका सौ. कोमलताई छत्रपती नैताम यांचा समावेश होता. तसेच, मान्यवर नगरसेवक मा. सतिशभाऊ विधाते, मा. विश्वजीतभाऊ कोवासे, तसेच श्री. हेमंतभाऊ मोहितकर, यांनीही विशेष उपस्थितीत हा सोहळा गौरवला.

 

सोहळ्यात वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक शामरावजी नैताम महाराज, रूपेशभाऊ टिकले, महादेवजी नैताम, तानाजी भुरसे साहेब, आबाजी चिचाघरे साहेब, विलासजी कुकडकार, बालाजी भांडेकर आणि हिंदू विचारक सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ नैताम उपस्थित होते. शिव गणेश मंडळ आणि नूतन शारदा महिला मंडळाचे कार्यकर्ते तसेच स्थानिक वॉर्डातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले.

 

भूमिपूजनाच्या सोहळ्यात सर्व उपस्थितांनी पारंपरिक विधीप्रकार पाळत हनुमान मंदिराच्या नव्या बांधकामासाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी वॉर्डवासीयांना सांगितले की, धार्मिक कार्य आणि सामाजिक बांधिलकी यासाठी एकत्र येणे फार महत्वाचे आहे.

 

विशेष म्हणजे, मंदिराच्या या नवीन बांधकामासाठी संपूर्ण खर्च स्थानिक नागरिकांच्या स्वेच्छेने दिलेल्या वर्गणीवरून केला जाणार आहे. हा उपक्रम वॉर्डवासीयांच्या सामुदायिक जबाबदारी आणि धार्मिक समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे. स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन मंदिराच्या विकासासाठी दिलेला हा सहभाग या समुदायाच्या एकतेचे आणि संस्कृतीवरील निष्ठेचे प्रतीक आहे.

 

लांझेडा वॉर्डच्या हृदयस्थानी असलेल्या या मंदिराचे बांधकाम फक्त धार्मिक दृष्ट्या नव्हे तर ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीनंही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नवीन बांधकामानंतर मंदिराचे सौंदर्य वाढेल, भक्तांसाठी अधिक सुसुविधा उपलब्ध होतील आणि वॉर्डमधील सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना अधिक जागा मिळेल.

 

यावेळी सोहळ्याचा उत्साह फक्त उपस्थित मान्यवरांपुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण वॉर्डवासीयांनी आपले सहकार्य दाखवून सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण केला. या मंदिराच्या उभारणीमुळे लांझेडा वॉर्डमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन अधिक समृद्ध होईल, तसेच स्थानिक समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक म्हणून या उपक्रमाला स्मरणीय स्थान मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!