Home गडचिरोली भामरागडमध्ये मोठी घटना! लाहेरी आश्रम शाळेतील 70 विद्यार्थ्यांची तब्येत अचानक खालावली; विद्यार्थ्याी...

भामरागडमध्ये मोठी घटना! लाहेरी आश्रम शाळेतील 70 विद्यार्थ्यांची तब्येत अचानक खालावली; विद्यार्थ्याी रूग्णालयात दाखल!

0
28

भामरागडमध्ये मोठी घटना! लाहेरी आश्रम शाळेतील 70 विद्यार्थ्यांची तब्येत अचानक खालावली; विद्यार्थ्याी रूग्णालयात दाखल!

 

28/01/2026

गडचिरोली: गडचिरोली जिल्हातील भामरागड तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या लाहेरी येथील शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल 230 विद्यार्थ्यांपैकी 70 विद्यार्थ्यांची अचानक तब्येत खालावल्याची गंभीर घटना घडली असून, त्यामुळे संपूर्ण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात एकच खडबड उडाली आहे.

 

या विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ व तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 विद्यार्थ्यांवर, तर भामरागड तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात 40 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

 

दरम्यान, भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 40 विद्यार्थ्यांपैकी 1 विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून, आणखी 10 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे हलविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

या गंभीर घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी अमर राऊत, तहसीलदार किशोर बागडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशन चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालय व आश्रम शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

 

घटनेनंतर विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून, प्राथमिक अंदाजानुसार शालेय भोजन किंवा पिण्याच्या पाण्यामुळे हा प्रकार घडला असावा, मात्र अधिकृत कारण तपास अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली असून, आश्रम शाळांमधील भोजन व आरोग्य व्यवस्थेबाबत प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची जोरदार मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!