Home गडचिरोली गडचिरोलीच्या विकासासाठी अजितदादांसोबतचे क्षण कायम स्मरणात – डॉ. देवराव होळी

गडचिरोलीच्या विकासासाठी अजितदादांसोबतचे क्षण कायम स्मरणात – डॉ. देवराव होळी

0
16

गडचिरोलीच्या विकासासाठी अजितदादांसोबतचे क्षण कायम स्मरणात – डॉ. देवराव होळी

मुंबई / गडचिरोली:

विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर 2014 ते 2024 या काळात गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी भावनिक शोकसंदेश व्यक्त केला आहे.

डॉ. होळी म्हणाले,

“माझ्या आमदारकीच्या काळात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रालयात व विधानसभा सभागृहात अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चा आज आठवत आहेत. रस्ते, आरोग्य, सिंचन, शिक्षण व मूलभूत सुविधांसाठी त्यांनी नेहमी सकारात्मक व निर्णयक्षम भूमिका घेतली.”

“दुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत त्यांनी कधीही राजकारण केले नाही. विकास हाच त्यांचा एकमेव अजेंडा होता. राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडी चे सरकार होते. तेव्हा गडचिरोली येते सुपर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मंजूर करण्यात आले होते. यावेळी मी मा. अजितदादा पवार यांना भेटून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी केली, तेव्हा अजितदादा यांनी म्हटले कि, डॉ. तुझ्या मनात जे आहे तेच होईल व सुपर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल च्या जागी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले.” असेही डॉ. होळी यांनी नमूद केले.

अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कणखर व विकासाभिमुख नेतृत्व गमावले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!