Home गडचिरोली प्रजासत्ताकदिनी डॉ. बाबासाहेबांचे नाव टाळल्याचा आरोप; गिरिश महाजनांविरोधात गडचिरोलीत वंचित बहुजन आघाडीचा...

प्रजासत्ताकदिनी डॉ. बाबासाहेबांचे नाव टाळल्याचा आरोप; गिरिश महाजनांविरोधात गडचिरोलीत वंचित बहुजन आघाडीचा तिव्र निषेध!

0
34
Oplus_131072

प्रजासत्ताकदिनी डॉ. बाबासाहेबांचे नाव टाळल्याचा आरोप; गिरिश महाजनांविरोधात गडचिरोलीत वंचित बहुजन आघाडीचा तिव्र निषेध!

 

गडचिरोली :

नाशिक येथील प्रजासत्ताकदिन समारंभात भाषण करताना ग्रामविकास मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी अनुसूचित जाती–जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

 

नाशिक येथील प्रजासत्ताकदिन कार्यक्रमाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून या घटनेमुळे फुले–शाहू–आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे आंदोलकांनी सांगितले. गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

 

प्रजासत्ताकदिन कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष गिरीश महाजन यांच्या समोर निषेध नोंदविणाऱ्या रणरागिनी माधवी जाधव यांच्या धाडसाचे यावेळी कौतुक करत त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. आंदोलनादरम्यान गिरीश महाजन, भाजप राज्य सरकार तसेच केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 

या निषेध आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे आणि ज्येष्ठ नेत्या वनिता बांबोळे यांनी केले.

 

आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे, निरीक्षक जी. के. बारसिंगे, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बंसोड, प्रतिक डांगे, गुलाब मडावी, शहराध्यक्ष तुळशिराम हजारे, तालुका उपाध्यक्ष मनोहर कुळमेथे, युवा नेते सिद्धांत बांबोळे, साहिल बोदेले यांच्यासह सुखदेव वासनिक, सिद्धार्थ गोवर्धन, नागसेन खोबरागडे, अमर खंडारे, प्रेमनाथ सोनटक्के, शांतीलाल लाडे, भगवान राऊत, खेमचंद इंदुरकर, सुनील उराडे, भारत रायपूरे, प्रेमदास रामटेके, निलम दुधे, नामदेव दुधे, पद्मा कांबळे, वैशाली वनकर, ज्योती उराडे, लता भैसारे, योगिता सहारे, अहिल्या सहारे, संघमित्रा राजवाडे, राहुल मेश्राम आदी शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!