चंद्रपूर | झेपत नसलेलं आश्वासन किमान लोकप्रतिनिधींनी देऊ नये. आश्वासन पूर्ण झालं नाही तर जनता असे चिमटे घेते की अंग लाल लाल होऊन जाते. चंद्रपूरच्या एका आमदारानं आश्वासन दिल. 200 युनिटच. या आश्वासनाला घेऊन एन दिवाळीच्या मोसमात आम आदमी पार्टीने चांगला झाडू फिरवला. आमदारकीच्या धाक दाखवत चंद्रपूर शहरात लावलेले बॅनर काढल्या गेले हे खर. मात्र जि लाज जायची होती ती गेलीच. ” बुंद से गई वो हौद से वापस नही आती है ” अशी एक हिंदी म्हण आहे, ती खरी ठरली. नेमकं काय आहे प्रकरण तेच आपण आता बघणार आहोत.
२०१९ मध्ये चंद्रपूरच्या विद्यमान आमदारांनी नागरिकांना २०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. मतदारांना भूलथापा देऊन विजय मिळविला. मात्र, चार वर्ष पूर्ण होऊनही ही मागणी पूर्ण झाली नाही. याच घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम आदमी पक्षाने शहरात दोनशे बॅनर लावले. त्यासाठी चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेण्यात आली होती .
शुल्कापोटी ८ हजार रुपये भरले. “200 युनिट” हा मुद्दा घेऊन फिल्मी डॉयलॉग असलेले बॅनर शहरभर लागले. सोशल मीडिया आणि माध्यमातून ते प्रचंड वायरल झाले. त्यामुळे खोके घेतलेल्या आमदाराला विजेचा जोरदार झटका बसला.आमदार कळेपिवळे झाले. आमदारानी मनपा अधिकाऱ्यांना फोन करून बॅनर काढण्यासाठी दबाव आणला, असा आरोप आपने केला आहे. या दबावापोटी महानगरपालिकेने बॅनर काढून टाकले. या कारवाईवर आम आदमी पक्षाने संताप व्यक्त केला होता . मनपात जाऊन ठीय्या आंदोलन केले. व काढलेले बॅनर लावायची मागणी लाऊन धरली होती.
शहरात लागनाऱ्या प्रत्येक बॅनरची परवानगी खरीच घेतली जाते का? आता हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला केला जात आहे . आम आदमी पार्टीने काय केलं तर आमदाराने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. एखाद्या महत्त्वाचा कामासाठी ताकद खर्ची न करता केवळ इव्हेंटवर अधिक लक्ष आमदार देत असल्याचा आरोपही केला गेला.आश्वासन पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष दिलं असतं तर टीकेची झोड कमी झाली असती.
मात्र सामान्य माणसाच्या महत्त्वाच्या गरजांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या भावनाशी खेळण्याचं काम लोकप्रतिनिधी करीत आहेत. महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून इतर उड्या मारल्या तर खरंच काय त्याचा फायदा होईल? शब्दांचा मलमपट्टीने जखमा बरे होत नाही, हे आमदारांना कोण सांगावं ? 200 युनिट मोफत मिळाले नसले तरी दोनशे रुपयांच्या तेलाने सामान्य माणसाने आपलं घर उजळून टाकलं आहे. या दिव्यांची धग येणाऱ्या निवडणुकीपर्यंत कायम राहील काय हे बघणं रंजक ठरणार आहे.

