Home Breaking News जनजातीय संकुल विकास परियोजनेच्या बैठकीत आदिवासीबहुल क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर चर्चा

जनजातीय संकुल विकास परियोजनेच्या बैठकीत आदिवासीबहुल क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर चर्चा

0
14

जनजातीय संकुल विकास परियोजनेच्या बैठकीत आदिवासीबहुल क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर चर्चा

नागपूरच्या रवी भवन येथे राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीशजी, राज्य सह संघटन मंत्री सतीशजी धोंड, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, ST मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न*

 

नागपूर : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या वतीने जनजातीय संकुल विकास परियोजनेच्या अनुषंगाने नागपूर येथील रवी भवन येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.

 

या बैठकीला भाजपा महाराष्ट्राचे सह संघटन मंत्री सतीशजी धोंड, राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार राजू तोडसाम, कपिल सहस्रबुद्धे, ST मोर्चाचे महामंत्री आकाश मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी जनजातीय संकुल विकास परियोजनेच्या माध्यमातून आदिवासीबहुल लोकसभा व विधानसभा क्षेत्रांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक उन्नतीसोबतच स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, आरोग्य, शिक्षण आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात नियोजन व पुढील कार्यवाहीबाबत विचारविनिमय करण्यात आला.

 

जनजातीय संकुल विकास परियोजना ही आदिवासीबहुल क्षेत्रांच्या गरजा लक्षात घेऊन विकासाची दिशा निश्चित करणारी महत्त्वपूर्ण संकल्पना असून, या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी, संघटनात्मक पदाधिकारी आणि विविध यंत्रणांच्या समन्वयातून विकासकामांना गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

 

या बैठकीमुळे जनजातीय संकुल विकास परियोजनेच्या पुढील वाटचालीसाठी दिशा व नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!