
एकता गणेश मंडळाला नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांची सदिच्छा भेट
चनकाईनगरात श्री गणरायाची विधिवत पूजा; मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत
गडचिरोली, दि. २२ सप्टेंबर २०२६ : चनकाईनगर येथील एकता गणेश मंडळाला गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.
नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी मंडळातील श्री गणरायाचे दर्शन घेत विधिवत पूजा-अर्चना केली. गडचिरोली शहरातील नागरिकांसह सर्व गणेशभक्तांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो, अशी प्रार्थना त्यांनी श्री गणरायाच्या चरणी केली.
याप्रसंगी गडचिरोली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष निखिल चरडे, नगरसेवक अंकुश नैताम तसेच सुरेश भांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी श्री गणरायाचे दर्शन घेत मंडळाच्या पदाधिकारी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. मंडळाच्या गणेशोत्सवातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
या भेटीप्रसंगी चनकाईनगर परिसरातील गणेशभक्त, महिला भगिनी, युवक, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षा निंबोरकर यांच्या भेटीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.








