Home Breaking News पर्यटन महोत्सवामुळे गडचिरोलीच्या पर्यटन विकासाला मिळणार चालना

पर्यटन महोत्सवामुळे गडचिरोलीच्या पर्यटन विकासाला मिळणार चालना

0
8

पर्यटन महोत्सवामुळे गडचिरोलीच्या पर्यटन विकासाला मिळणार चालना

‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’च्या संकल्पनेला जिल्हाधिकाऱ्यांकडून मूर्त स्वरूप; मुख्य प्रवर्तक, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले अभिनंदन*

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी अविशान्त पंडा यांनी जिल्ह्यात चार पर्यटन सर्किट तयार करून दि. २३ ते २८ सप्टेंबरदरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचे *‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’* च्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये पर्यटन क्षेत्राला महत्त्वाचे स्थान असून, जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, गड-किल्ले, जलसंपदा तसेच आदिवासी संस्कृतीच्या माध्यमातून पर्यटन विकासाला मोठी संधी असल्याचे ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’च्या कार्यशाळेत मांडण्यात आले होते. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच जिल्ह्याची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्यावर भर देण्यात यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली होती.

या संकल्पनेला जिल्हाधिकारी अविशान्त पंडा यांनी पर्यटन सर्किट आणि पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीचे स्वरूप दिल्याबद्दल आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली कृती/निर्माण समितीचे मुख्य प्रवर्तक, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

गडचिरोलीच्या पर्यटन विकासासाठी प्रशासनाने सुरू केलेला हा उपक्रम ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’च्या विकास संकल्पनेशी सुसंगत असून, पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळेल, पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्य प्रवर्तक, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केला.

दि. २३ ते २८ सप्टेंबरदरम्यान आयोजित पर्यटन महोत्सवाला जिल्ह्यातील नागरिक, पर्यटक, पर्यटनप्रेमी आणि स्थानिक युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करत मुख्य प्रवर्तक, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी पर्यटन महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!