Home Breaking News _गडचिरोलीत माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घेतले महालक्ष्मीचे व गणरायाचे दर्शन_

_गडचिरोलीत माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घेतले महालक्ष्मीचे व गणरायाचे दर्शन_

0
7

_गडचिरोलीत माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घेतले महालक्ष्मीचे व गणरायाचे दर्शन_

——————————————

_भाजपाचे जेष्ठ नेते डॉ. भारत खटी यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीचे दर्शन तर अक्षय इंगळे यांच्या निवासस्थानी गणरायाचेही घेतले दर्शन_

 

गडचिरोली | दि. १९ सप्टेंबर २०२६ :

महालक्ष्मी व गणेशोत्सवाच्या निमित्ताने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गडचिरोली शहरातील भाजपाचे जेष्ठ नेते डॉ. भारत खटी यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीचे मनोभावे दर्शन घेतले. तर युवा नेते अक्षय इंगळे यांच्या निवास्थानी गणरायाचे पूजन करून सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली.

 

यावेळी विश्व हिंदु परिषदेचे नेते रामायणजी खटी,माजी जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे,नंदकिशोर काबरा यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!