Home Breaking News नगराध्यक्षा ॲड. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांच्या वाढदिवसाला सेवेचा स्पर्श ; गडचिरोलीत विविध...

नगराध्यक्षा ॲड. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांच्या वाढदिवसाला सेवेचा स्पर्श ; गडचिरोलीत विविध समाजोपयोगी उपक्रम

0
17

नगराध्यक्षा ॲड. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांच्या वाढदिवसाला सेवेचा स्पर्श ; गडचिरोलीत विविध समाजोपयोगी उपक्रम

 

शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व खाऊ वाटप; रक्त तपासणी-रक्तदान, आरोग्य तपासणी आणि ‘माणुसकीचा घास’ उपक्रमाचे आयोजन

 

गडचिरोली, दि. १८ सप्टेंबर २०२६ : गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मा. ॲड. सौ. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी शहरात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचा आनंद समाजातील विद्यार्थी, रुग्ण आणि गरजू नागरिकांसोबत सेवाकार्यातून साजरा करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, गडचिरोली शहराच्या वतीने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

 

या सेवाभावी कार्यक्रमांची सुरुवात सकाळी १० वाजता नगर परिषद अंतर्गत जवाहरलाल नेहरू शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक वाटपाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.२० वाजता नगर परिषदेच्या राजीव गांधी शाळेतील विद्यार्थ्यांनाही नोटबुकचे वाटप करण्यात येणार आहे.

 

सकाळी १०.४० वाजता पंचवटी नगर येथील शिवमंदिर परिसरात रक्त तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासोबतच गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

त्यानंतर सकाळी ११ वाजता लांझेडा येथील अंगणवाडीतील बालकांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वाजता इंदिरा गांधी चौक येथील रेस्ट हाऊस परिसरात आरोग्य तपासणी शिबिर होणार असून नागरिकांना आरोग्य तपासणीचा लाभ घेता येणार आहे.

 

या उपक्रमांच्या मालिकेतील आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ‘माणुसकीचा घास’. दुपारी १२ वाजता गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात हा उपक्रम राबविण्यात येणार असून रुग्ण, त्यांचे नातेवाईक व गरजूंसाठी सेवाभावातून भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

नगराध्यक्षा ॲड. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांच्या वाढदिवसाला केवळ उत्सवी स्वरूप न देता ‘सेवा, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी’ या संकल्पनेतून विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांपासून आरोग्यसेवा, रक्तदान आणि गरजूंसाठी भोजनापर्यंत विविध क्षेत्रांना या उपक्रमांमध्ये स्थान देण्यात आले आहे.

 

“वाढदिवसाचा आनंद सेवाकार्यातून साजरा करूया” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये शहरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी, गडचिरोली शहराच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!