Home Breaking News शिक्षक हे समाज आणि राष्ट्र घडविणारे खरे शिल्पकार; सेवानिवृत्त शिक्षकांचे अनुभव व...

शिक्षक हे समाज आणि राष्ट्र घडविणारे खरे शिल्पकार; सेवानिवृत्त शिक्षकांचे अनुभव व मार्गदर्शन नव्या पिढीसाठी प्रेरणादायी! नगराध्यक्ष अँड प्रणोती निंबोरकर

0
15
Oplus_131072

शिक्षक हे समाज आणि राष्ट्र घडविणारे खरे शिल्पकार; सेवानिवृत्त शिक्षकांचे अनुभव व मार्गदर्शन नव्या पिढीसाठी प्रेरणादायी! नगराध्यक्ष अँड प्रणोती निंबोरकर

सेवानिवृत्त शिक्षकांसोबत शिक्षक दिन उत्साहात; शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकार्याचा सन्मान

 

गडचिरोली, दि. ५ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गडचिरोलीच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे सेवा देत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर म्हणाल्या की, “शिक्षक हे समाज आणि राष्ट्र घडविणारे खरे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरती शिक्षकांची भूमिका मर्यादित नसून त्यांच्यावर संस्कार करणे, शिस्त रुजविणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि जीवनाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करतात.”

सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांकडे असलेला प्रदीर्घ अनुभव, ज्ञान आणि मार्गदर्शन समाजासाठी अमूल्य आहे. नव्या पिढीला घडविण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणे आवश्यक असून शिक्षकांनी केलेले कार्य समाज कायम स्मरणात ठेवतो, असेही नगराध्यक्षा निंबोरकर यांनी नमूद केले.

शिक्षक दिनानिमित्त सर्व आजी-माजी शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी त्यांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे पदाधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!