Home गडचिरोली नगराध्यक्ष प्रणोती सागर निबोंरकर यांच्या हस्ते नगर परिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाळकर...

नगराध्यक्ष प्रणोती सागर निबोंरकर यांच्या हस्ते नगर परिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाळकर यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

0
16
Oplus_131072

नगराध्यक्ष प्रणोती सागर निबोंरकर यांच्या हस्ते नगर परिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाळकर यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

 

30/01/2026

गडचिरोली: नगर परिषद बांधकाम सभापतीपदी नवनियुक्त अनिल कुनघाळकर यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. नगर परिषद कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला *नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाला”* . यावेळी उपनगराध्यक्ष,सर्व सभापती, सर्व नगरसेवक, न.प.अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अनिल कुनघाळकर यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. नगराच्या विकासासाठी सक्षम आणि समन्वयात्मक नेतृत्व आवश्यक असून, बांधकाम सभापती म्हणून अनिल कुनघाळकर हे जबाबदारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.*

 

*पदग्रहणानंतर बोलताना अनिल कुनघाळकर म्हणाले की, नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगराच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार, टिकाऊ आणि पारदर्शक बांधकामावर भर दिला जाईल. रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा व इतर मूलभूत नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येईल. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.*

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनिल कुनघाळकर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि बांधकाम सभापती म्हणून अनिल कुनघाळकर यांच्या निवडीमुळे नगरातील विकासकामांना निश्चितच गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

 

साध्या पण उत्साही वातावरणात हा पदग्रहण सोहळा पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!