Home गडचिरोली आठव्या दिवशीही पेसा कायद्यातील ग्राम वीज सेवकांचे आंदोलन कायम; डॉ. नामदेवराव उसेंडी...

आठव्या दिवशीही पेसा कायद्यातील ग्राम वीज सेवकांचे आंदोलन कायम; डॉ. नामदेवराव उसेंडी यांची भेट 

0
21

आठव्या दिवशीही पेसा कायद्यातील ग्राम वीज सेवकांचे आंदोलन कायम; डॉ. नामदेवराव उसेंडी यांची भेट

माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांची आंदोलनस्थळी भेट, सकारात्मक चर्चा

गडचिरोली :गडचिरोली येथील पोटेगाव रोड ऊर्जागड परिसरात पेसा कायदा अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्राम वीज सेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आज माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

डॉ. उसेंडी यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून थेट संबंधित विभागाच्या संचालक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत ग्राम वीज सेवकांच्या प्रश्नांबाबत संवाद साधला. यावेळी संबंधित विभागाकडून मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले असून त्या संदर्भात पुढील कार्यवाहीसाठी चर्चा घडवून आणण्यात आली.

या आंदोलनस्थळी सरपंच संजय गावडे, ग्राम विकास सेवक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नरोटे, उपाध्यक्ष गजानन परचाके, कोषाध्यक्ष संजय मडावी, पवन आत्राम, प्रकाश कस्तुरे, आशिराम उसेंडी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्राम वीज सेवक उपस्थित होते.

 

ग्राम वीज सेवकांच्या प्रमुख मागण्या :

करार संपल्यानंतर एक दिवसाचाही खंड न ठेवता तात्काळ पुढील करारवाढीचे लेखी आदेश निर्गमित करावेत.

पेसा कायदा अंतर्गत कार्यरत सर्व ग्राम वीज सेवकांचे मानधन ५,००० रुपयांवरून वाढवून किमान २५,००० रुपये प्रतिमाह करण्यात यावे.

ग्राम वीज सेवकांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे.

ग्राम वीज सेवकांना जीवन विमा व अपघात विमा संरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.

शासनाच्या नियमानुसार मिळणारे सर्व शासकीय लाभ, सुविधा व संरक्षण पेसा कायदा अंतर्गत कार्यरत ग्राम वीज सेवकांना देण्यात यावेत.

डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी ग्राम वीज सेवकांच्या मागण्या रास्त असून त्या पूर्ण होण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, असा विश्वास यावेळी आंदोलनकर्त्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!